छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) घराचा स्लॅब टाकताना मिक्सर मशीनला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने शॉक लागून दोन मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना मिसारवाडीत रविवारी (दि. १२) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. पोलीस व महावितरणला माहिती न दिल्यामुळे घाटीतून
७एमएलसी पोलीस ठाण्यात आल्यानंतर संध्याकाळी वाजता हा प्रकार उघडकीस आला. बांधकाम ठेकेदार आणि घरमालक पसार झाले. या प्रकरणी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विशाल अंकुश चव्हाण (२६, रा. जयभवानीनगर) आणि मलकन बापू जाधव
घटनेनंतर ठेकेदार, घरमालक पसार
▶ घटनेची माहिती विशाल आणि मलकन यांच्या नातेवाईकांना मिळाल्यावर ते घाटीत धावले. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. तेथून ते सिडको ठाण्यात गेले. मात्र, त्यांना ठेकेदार आणि घरमालक कुठेही भेटले नाहीत. जखमींना घाटीत दाखल करण्यात आले.
(३५, रा. विठ्ठल मंदिरजवळ, मुकुंदवाडी) अशी मृतांची नावे आहेत, असे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले. घटनास्थळी उपनिरीक्षक निवृत्ती गायके, सहायक उपनिरीक्षक सुभाष शेवाळे यांच्यासह बीट अंमलदारांनी धाव घेत माहिती घेतली.
मिसारवाडीत एका महिलेच्या दुमजली घराचे स्लॅब टाकण्याचे काम रविवारी सुरु होते. गल्लीतील रस्त्यावरून महावितरणचे खांब गेलेले असून त्यावर उघड्या तारा आहेत. जागा अपुरी असल्याने स्लॅब टाकण्यासाठी आणलेले मिक्सर मशीन तारांच्या अगदी जवळच उभे केले होते. मिक्सरमध्ये वाळू, सिमेंट, खडी याचा माल एकत्र केल्यानंतर क्रेनच्या माध्यमातून वर नेताना
उघड्या तारांना स्पर्श झाला. त्याचवेळी पुढे आलेल्या दोन मजुरांना शॉक लागला. ते जागीच कोसळले.
मृत माहितीनुसार, विशालच्या वडिलांचे निधन झालेले आहे. विशाल विवाहित होता. त्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. विशाल आणि त्याच्या मोठ्या भावावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. आता विशालच्या मृत्यूमुळे त्याची दोन्ही लेकरे पोरकी झाली, असा टाहो विशालच्या नातेवाईकांनी फोडला. अणूंना वाट मोकळी करून देत आता त्याच्या लेकरांना पप्पा परत येणार नाही, हे कसे सांगावे, या विचाराने त्याचा भाऊ ढसाढसा रडला. यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.














